जैन मुनींची निघृण हत्या झाल्या प्रकरणी जैन समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन…..
प्रतिनिधी – एरंडोल जैन समाजा तर्फे कर्नाटक राज्यातील हिरेकोडी येथे काही समाजकंटकांनी जैन मुनि कामकुमार नंदी यांची निघृण हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करुन ट्यूबवेल मध्ये टाकले. तसेच भारतात जैन मंदीरांवर होत असलेले अवैध कब्जे , जैन मुनीचे होत असलेले अपघात या विरुद्ध सकल जैन समाज तर्फे सर्व दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला.
जैन मुनींची हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर कारवाई करुन त्यांना फाशिची शिक्षा मिळावी व जैन समाजास न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
जैन समाजातर्फे निवेदन देतांना ॲड. ए. एम. काळे , सुनील ईश्वरालाल जैन, ॲड. चंदन ए. काळे, जितेंद्र जैन आदी जैन बांधव व भगिनी उपस्थित होते.