आ. जयकुमार गोरे यांना श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार व
एरंडोलचे निवृत्त तहसिलदार अरूण माळी यांना संत सावता महाराज विशेष पुरस्कार
एरंडोल – श्रीसंत सावता महाराज समाधी सोहळा २०२३ निमित्ताने यावर्षी सातारा माण खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांना श्रीसंत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार २०२३ जाहीर झाला असून एरंडोल येथील निवृत्त तहसिलदार तथा सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरूण माळी यांना संत सावता महाराज विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीचे सीए के.एस. माळी यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रम दि. २२ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ ते ३ वेळात पुणे समताभूमी फुलेवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात इतर मान्यवरांना देखील विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दशरथ कुळधरण यांनी दिली आहे.
इतर पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे –
- फुले दांपत्य पुरस्कार मान्यवर :-1. डॉ. सुनिता शिंदे व श्री संपत शिंदे औरंगाबाद सामाजिक. 2. डॉ. वसुधा कर्णे व डॉ. अजय कर्णे दहिवडी सातारा आरोग्य. 3. सौ. वर्षा थोरात व श्री. रवींद्र थोरात सामाजिक. 4. सौ. शिला चर्जन व जयकुमार चर्जन सत्यशोधक. 5. सौ मनीषा काटे व देवेंद्र काटे, नागपूर उद्योग .
- सावित्रीबाई फुले पुरस्कार मान्यवर :-1. सौ. वैशाली महाजन नाशिक, शिक्षण. 2. सौ. भारती सातव, पुणे शिक्षण. 3. सौ. तनुजा जाधव औरंगाबाद सामाजिक. 4. सौ. देवकी शिंदे मुंबई उद्योग. 5. डॉ. पुष्पलता शिंदे उदापूर जुन्नर आरोग्य.
- संत सावता महाराज विशेष पुरस्कार मान्यवर :-1. श्री. राजाभाऊ हाडोळे अमरावती सामाजिक 2. श्री. अरुण माळी जळगाव सामाजिक. 3. श्री. सुभाष अडसूळ नायगाव सामाजिक. 4.श्री. अनंत बगाडे, अकोला सामाजिक. 5. श्री. सुरेश विष्णू माळी, सांगोला उद्योग क्षेत्र.
- महात्मा फुले उद्योग पुरस्कार मान्यवर :- 1. श्री. संजय टिळेकर, पुणे उद्योग. 2. श्री. शरद मंडलिक, नाशिक उद्योग. 3. श्री. विनोद पुंड, नगर उद्योग. 4. श्री. मृणाल ढोले पाटील, पुणे सामाजिक. 5. श्री. भीमराव कोथींबीर श्रीगोंदा नगर सामाजिक.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्र्ये करणार्या मान्यवरांना अखिल भारतीय माळी समाजाच्या वतीने विशेष पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येते. कार्यक्रमासाठी समाजातील मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे विशाखा येवतकर यांनी सांगितले. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अभिनेत्री वैशाली धाकुलकर, राज्याच्या अध्यक्ष अभिनेत्री अपूर्वा सोनार देखील उपस्थित राहणार आहेत. कार्यक़्रमास राज्यातील सावित्रीच्या लेकी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित असतील.