एरंडोल येथील युवकांनी घडविले मानवतेचे दर्शन ; मतिमंद मुलीला मिळाला आसरा.

GridArt_20230723_101800319.jpg

एरंडोल: येथे युवा सामाजिक कार्यकर्ते विक्की खोकरे हे आरोग्यदूत सर्वांना परिचित आहेत. त्यांनी व त्यांच्या सेवाभावी सहकारी अरुण साळी यांनी २२ जुलै रोजी एका बेवारस- मतिमंद मुलीस चोपडा तालुक्यातील वेले येथील ‘मानव सेवा तीर्थ, बेवारस मनोरुग्णांचे उपचार व पुनर्वसन केंद्रात दाखल करून मानवतेचे दर्शन घडविले.

विशेष हे की सदरील बालिका ही अवघ्या १० वर्षाची असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतच्या हॉटेल साईनाथ परिसरात बेवारस अवस्थेत मिळुन आली. सध्या मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता विक्की खोकरे व अरुण साळी यांची कामगीरी केवळ मोलाची नसून बहूमोलाची आहे. अश्या आशयाची चर्चा जनमानसात होत आहे.
एक मुलगी एरंडोल-पारोळा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल साईनाथ च्या समोर हॉटेलचे संचालक नितीन धनगर यांना दुभाजकावर फिरताना आढळली.

धनगर यांनी लागलीच मदतीसाठी विक्की खोकरे यांना फोन केला व सदर मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धनगर यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला आणले. हि घटना कळताच विक्की खोकरे व अरुण रामरतन साळी यांनी पोलिस स्टेशन गाठत या मुलीच्या भविष्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्वखर्चातून तिला २ नविन ड्रेस घेऊन चोपडा तालुक्यातील वेले येथे असलेल्या बेवारस मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसन आश्रय केंद्रात दाखल केले.
या कामगिरी बद्दल विक्की खोकरे, नितिन धनगर,अरुण साळी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!