डी. डी. एस. पी. कॉलेज येथे महाविद्यालयातील विद्यार्थि व विद्यार्थिनिं समवेत नव मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
नवीन मतदार नोंदणी व मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न
एरंडोल प्रतिनिधी – दि. २५ जूलै २०२३ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालय डी. डी. एस. पी. कॉलेज एरंडोल येथे महाविद्यालयातील विद्यार्थि व विद्यार्थिनी समवेत नव मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. डॉ. श्रीमती मिना नामदेव काळे यांनी केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्षपद वंशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा.अमितदादा पाटील यांनी भुषविले व मतदार जनजागृती आणि नव मतदारांना संबोधुन अध्यक्षीय भाषण केले. तथा एरंडोल तहसिलदार मा. सुचिता चव्हाण यांनी नव मतदारांना संबोधुन लोकशाही बळकटी करणासाठी आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती व नव मतदारांना मोलाचे मार्गदर्शन केले. व भारत निवडणुक आयोगाने मतदान यादीचा घोषीत विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम बाबत गावागावांत नेमणुक केलेल्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मार्फत नविन मतदार नोंदणी मतदान कार्डला आधार कार्ड जोडणी करणे, दिव्यांग मतदार व तृतिय पंथी मतदार यांच्या नावाची नोंदणी तसेच मतदारांच्या नांवात दुरुस्ती, मयत व स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळणे, मतदार यादीत अस्पष्ट असलेल्या मतदारांचा नव्याने फोटो घेवुन तो अद्यावत करुन घेणे, घरात ८० वर्षापेक्षा जास्त वयाचे वरिष्ठ नागरीक असतील तर त्यांचे नांव अद्यावत करून घेणे बाबत सांगण्यात आले. या महत्वपूर्ण कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी सतिश खैरनार, यश चौधरी, विद्यार्थिनी गिती वाघ, प्राची शिवदे, पुनम ठाकुर यांची बॉन्ड ॲम्बेसिडर म्हणुन नेमणुक करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असे की या कार्यक्रमात नंद मतदारांचे फॉर्म क्र. ०६ हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत घेवून मतदार सेल्फी पॉईट द्वारे नंव मतदार यांची सेल्फी देखील काढण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. जे. पाटील व उप प्राचार्य प्रा. ए. ए. बडगुजर यांनी ग्रहण केले आणि सदर कार्यक्रमाचे आभार पा. डॉ. बालाजी पवार यांनी व्यक्त करून मा. अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रमाचे समापन केले. या कार्यक्रमात तहसिल कार्यालयाच्या निवडणुक शाखेचे महसूल सहायक मनोहर राजिंदे, अ.का. मधुकर नंदनवार, म. सा. महेंद्र सुतार व संगणक परिचालक ललित पाटील प्रा. विजय गाडे, प्रा. शेखर पाटील आदी उपस्थित होते. सदर महत्वपूर्ण कार्यक्रमाचे उपलक्ष साधुन मा. तहसिलदार श्रीमती सुचिता चव्हाण यांनी नव मतदार यांना सद्या चालु असलेल्या पुर्नरिक्षण कार्यक्रमात नांव नोंदणी करण्याचे व सर्व मतदारांनी आगामी निवडणुकांमध्ये आपले प्रथम कर्तव्य व हक्क समजुन मतदान करण्याचे अवाहन केले.