Viral Video नदीला अचानक पुर आला, ज्यामुळे चिता जळण्याआधी पाण्यातून वाहून गेली.

n52156288416902808306310085e6426336df9c6a0889f7a2b18bbdadd26eff95fd1398c3be97a279456ee6.jpg

सध्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर दिल्ली व हिमाचलमध्ये तर अत्यंत वाईट परिस्थीती उद्भवली आहे
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आला आहे. या व्हिडीओतील दृश्य खूपच वेदनादायी आहे. मेल्यानंतर देखील मृत शरीराला अग्नी नशिब होत नाही हे फारच दुर्दैवी आहे.



या व्हिडीओत एका व्यक्तीची जळती चिता पाण्यात वाहून जाताना पूर्णपणे दिसत आहे. बहुतांश ठिकाणी नदी किनारी मृतांना अग्नी दिली जाते. असंच एका व्यक्तीच्या मृतदेहाला नदीच्या काठी अग्नी दिली होती. परंतु तेव्हाच नदीला अचानक पुर आला, ज्यामुळे चिता संपूर्ण जळण्याआधी पाण्यातून वाहून गेली.

त्यासोबत मृतदेह देखील वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच मृतदेहाला अग्नि नशिब झाली नाही.

About Author

You may have missed

error: Content is protected !!