कायद्याचा चूकीचा अर्थ लावून अर्जदारांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचणार !
-माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांचा इशारा.
प्रतिनिधी – माहिती अधिकार कायद्याचा आपल्या सोईनुसार अर्थ लावायचा, आणि आपल्या कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना संभाळून घ्यायचे आणि तक्रारदार नागरिकांच्या तक्रारीला वाटाण्याच्याा अक्षता लावायच्या हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आवडता उद्योग झाला असून अशा अधिकाऱ्यांना कोटात खेचून त्यांच्या विरोधात परमादेश रीट याचिका दाखल करण्याचा इशारा पाचोरा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांनी दिला आहे. या संबंधी अधिक माहिती देताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पाचोरा तालूका अध्यक्ष पंकज पाटिल यांनी सांगितले की त्यांनी जनमाहिती अधिकारी गट विकास अधिकारी कार्यालय पाचोरा यांच्या कडे ग्रामसेवक समाधान पाटील यांच्या सेवा पुस्तिकेची झेरॉक्स मागीतली होती.सदर माहिती ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात देणे कायद्याला अपेक्षित असताना अर्जदारांना जनमाहिती अधिकारी यांनी माहिती तयार करून दिली. यावरून पंकज पाटिल यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे यांचेकडे अनियमतेच्या पुराव्या सहित लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अनियमीतता व बेकायदेशीर कृत्य प्रकरणी माहिती आयुक्त यांना कारवाई व शिक्षा करण्याचे अधिकार असल्याचा कायद्याचा चूकीचा अर्थ लावून पंकज पाटील यांच्या तक्रार अर्जाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून तक्रार अर्ज नस्तीबंद केला आहे. वास्तविक माहिती आयुक्त यांना केवळ माहिती न पुरविल्यास कारवाई करण्याचे मर्यादित अधिकार आहेत. पण आपली जबाबदारी झटकून माहिती आयुक्त कार्यालयाकडे बोट दाखवून अर्जदारांची हेतूतः दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न स्नेहा कुडचे या अधिकारी करीत आहेत.यावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची कायद्याप्रती प्रमाणिक सचोटी नसल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीतून भ्रष्टाचाराचे पूरावे समोर आल्यास वरीष्ठ अधिकाऱ्ंयानी दोषी कनिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वर कठोर प्रशासकीय कारवाई करावी असे शासन आदेश असताना प्रशासनातील अधिकारी एकामेका साह्य करू अवघे धरु भ्रष्टपंथ या नितीने चालत आहेत.यातून भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असून या प्रवृत्तीच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टात लवकरच परमादेश याचिका दाखल करणार असल्याचा इषारा पंकज पाटिल यांनी सदर प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.