एरंडोलला शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप.
प्रतिनिधी – एरंडोल येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. नुकत्याच इरशाळवाडी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवसचा कोणताही सोहळा साजरा न करता सामाजिक उपक्रमाद्वारे जनतेची सेवा करून साजरा करावा अशा आशयाची सूचना शिवसैनिकांना केली होती. त्याच पार्श्वभूमीवर एरंडोल शिवसेनेतर्फे ग्रामीण रुग्णालयातील गरजू रुग्णांना फळे वाटप करून सहकार्य करण्यात आले तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेऊन सदैव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचे वचन दिले.
याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित पुराणिक,दशरथ चौधरी, परेश बिर्ला, हेमंत भोळे, अमोल भावसार, चंदू जोहरी, रवींद्र चौधरी, बाळा राजपूत, कल्पेश राजपूत, नितीन महाजन, प्रसाद महाजन, कुणाल पाटील, दीपक गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.