गोंडगाव येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एरंडोलला हजारो नागरिकांचा मुक मोर्चा.
महिला व युवकांचा मोठा सहभाग.
एरंडोल-गोंडगाव (ता.भडगाव) येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार करून तिची
निर्घृणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक , शैक्षणिक , राजकीय संघटना , महिला मंडळे व सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्यावतीने शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्यावतीने आमदार चिमणराव पाटील,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे , तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.गोंडगाव घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा,खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी , आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.मूक मोर्चात शहरातील व ग्रामीण भागातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चातील महिला , विद्यार्थिनी आणि युवकांची संख्या लक्षणीय उपस्थिती होती. गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ शहरात विविध सामाजिक , शैक्षणीक , राजकीय व महिला संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.गांधीपुरा भागातील होळीमैदान येथून सकाळी दहा वाजता मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा नेण्यात आला.मोर्चेक-यांच्यावतीने
आमदार चिमणराव पाटील,तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना निवेदन देण्यात आले.अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या याची
सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्यात यावी,पिडीत मुलीच्या वडिलांना शासकीय मदत देण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी
आमदार चिमणराव पाटील यांनी पिडीत बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केला जाईल असे सांगितले.गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सदस्य नाना महाजन , कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,शकुंतला अहिरराव , उषाकिरण खैरनार,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन व महाविद्यालयीन
विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील , तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) , रवी चौधरी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड , युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील , चिंतामण पाटील,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे
अध्यक्ष अमित पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले,जिल्हासरचिटणीस राजेंद्र शिंदे,प्रा.मनोज पाटील,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील , जगदीश ठाकूर,अभिजित पाटील,मनोज मराठे,गजानन पाटील,माजी सभापती अनिल महाजन, कैलास पारधी,नंदा शुक्ला,शोभना साळी,सचिन विसपुते, यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी,महिला मंडळ सदस्या,महाविद्यालयीन
विद्यार्थिनी उपस्थित होत्या.