पारोळा येथे भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन – शिवकालीन इतिहास हा विद्यार्थ्यांपासून जनमाणसात पोहचावा यासाठी डॉ. संभाजी राजे पाटील फाउंडेशन तर्फे आयोजन
प्रतिनिधी एरंडोल – स्पार्क फाऊंडेशन अमळनेर यांचे इतिहासाचे अबोल साक्षीदार असलेले अत्यंत दुर्मिळ शस्त्र्यांचे प्रदर्शन अनेक वर्षांपासून संग्रहित केले 500 हून अधिक अत्यंत दुर्मिळ शस्त्र व वस्तुज्या शस्त्रांनी स्वराज्याचे रक्षण केले, शत्रूला पळते केले, अशा शिवकालीन पवित्र शस्त्रांचे तिन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन डॉ. संभाजी राजे पाटील फाउंडेशन तर्फे शहारातील विजयानंद हॉल मध्ये करण्यात आले आहे. या शस्त्रास्त्र प्रदर्शनात युध्दात वापरलेल्या अस्सल (ओरिजनल) तलवारींचे प्रकार, कुऱ्हाडी, कट्यारी, छुरा व भाल्यांचा दांडपट्टा,वाघनखे, चिलखत, बिचवे यांसह अनेक प्रकारचे दुर्मिळ शस्त्रास्त्रे पाहण्याचा योग तालुक्यातील सर्व विद्यार्थी , इतिहास अभ्यासक ,संशोधक, शिवप्रेमी व नागरिकांसाठी इतिहासकालीन शस्त्रांविषयी महत्वाची माहिती प्राप्त होऊन ती भविष्यात ही लाभदायक ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातील देखील 80 हून अधिक प्रदर्शने केली असे अमळनेर येथील प्रसिद्ध शस्त्र संग्राहक व इतिहास अभ्यासक पंकजजी रवींद्र दुसाने ज्यांच्याकडे अनेक वर्षांपासून संग्रहित असणारे 500 हून अधिक अत्यंत दुर्मिळ शस्त्र व नाणे वस्तु यांचा मोठ्याप्रमाणात संग्रह आहे.
हे प्रदर्शन विनामुल्य असून कार्यक्रम स्थळी शिवकालीन गुप्तहेर करपावली कला तसेच रायफल शूटिंग चा प्रत्यक्ष अनुभव देखील घेता येणार आहे. दिनांक ११, १२ व १३ असे तीन दिवस हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्वांनी या भव्य दिव्य शिवकालीन शस्त्रास्त्रे प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ संभाजी राजे पाटील यांनी केले आहे. ह्या प्रदर्शन यशस्वीतेसाठी विविध संस्था, संघटना, असोसिएशन, युवा मंच, मित्र परिवार, संघ, व्यायाम शाळा, ग्रुप, मंडळ आणि शिवप्रेमींचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात शिवकालीन दुर्मिळ शस्त्र्यांचे प्रदर्शने करीत आहे. आपल्या खांदेशात मी अनेक प्रदर्शने केलीत मात्र पारोळा वासीयांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे नक्की भेट द्या कारण शिवकालीन इतिहास हा विद्यार्थ्यांपासून जनमाणसात पोहचला पाहिजे असे आवाहन प्रसिद्ध शस्त्रसंग्राहक व इतिहास अभ्यासक पंकजजी रवींद्र दुसाने, अमळनेर यांनी केले