भक्ती मासानिमित्त जादा बसेस सोडण्याची महिला वर्गाची मागणी..

Picsart_23-08-13_06-15-51-639.jpg

एरंडोल प्रतिनिधी – सध्या भक्ती मास सुरू असून येणाऱ्या काही दिवसात श्रावण मास आरंभ होणार आहे . या दोन्ही मासांचे औचित्य साधून तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक भाविक पद्मालय येथे दर्शनाकरिता येत असतात. अनेक महिला भाविक एरंडोल येथून श्री क्षेत्र पद्मालय येथे दर्शनासाठी जात असतात परंतु त्यांना महामंडळाच्या बसेस खाजगी वाहनांचा उपयोग करून दर्शनाला जावे लागते यामुळे महिला वर्गांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
एरंडोल तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र पद्मालय हे सुमारे १२ किलोमीटर असून या ठिकाणी भक्ती मास व श्रावण मासानिमित्त अनेक भाविक एरंडोल परिसरातील जिल्ह्यातील, पर राज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात यात मुख्यत्वे महिला वर्गांचा समावेश जास्त असतो तसेच एरंडोल हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणावरून श्री क्षेत्र पद्मालय येथे त्यांना दर्शनासाठी जावे लागते यासाठी सदर महिलांना नेहमी खाजगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. तसेच शासनातर्फे महिला वर्गांना मिळणाऱ्या सवलतीचा महिलांना फायदा होत नाही.
त्यामुळे खाजगी वाहनांच्या मनमानी भाडे आकारणी मुळे मनस्ताप सहन करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळा तर्फे फक्त एक बस सकाळी क्षेत्र पद्मालय येथे जाते व दुपारी परत येते. तरी महामंडळातर्फे भक्ती मास व श्रावण मासानिमित्त अधिक बसेस सोडण्याची मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!