चौपदरीकरण होऊनही बसस्थानक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात..!

IMG-20230815-WA0151.jpg

एरंडोल: येथे बसस्थानासमोर व संरक्षण भिंत परीसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काली-पिली, मिनिडोअर,विक्रेत्यांच्या हातगाड्या यांच्या वाढत्या अतिक्रमणाचा चौपदरी महामार्गा सह समांतर रस्त्याला विळखा बसल्यामुळे महामार्गावरून धुळे – पारोळा व कासोदा-पाचोरा-चाळीसगाव कडून जळगाव कडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
विशेषतः धुळे – पारोळा व उत्राण-कासोदा मार्गाने येणाऱ्या बसगाड्यांना बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

एरंडोल बसस्थानकासमोर व स्थानकामागचा शहरातून येणारा रस्ता या परीसरात विक्रेत्यांच्या हातगाड्या, हॉटेल चालकांची तात्पुरती अतिक्रमणे महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी उभी केलेली वाहने तसेच हॉटेल समोर पार्क केलेली वाहने या साऱ्या अतिक्रमणरुपी बकासुरामुळे या परीसरात बेशिस्ती ने कळस गाठला आहे. सदर अतिक्रमणे हटवुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण,स्थानिक न.पा.प्रशासन, आर.टी.ओ विभाग व पोलिस प्रशासन यांनी सामूहिक पणे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यासाठी ‘भीमरूपी, उपाययोजना करणे नितांत गरजेचे आहे. या भागात अतिक्रमणांचा बेसुमार सुळसुळाट वाढल्यामुळे या ठिकाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जर सदर अतिक्रमणे यापुढे हि अशीच दुर्लक्षित झाली तर मोठ्या अपघाताला आमंत्रण दिले जाऊ शकते.
महामार्गाचे रुंदीकरण हे अतिक्रमण धारकांसाठी झाले का असा संतप्त सवाल केला जात आहे. हा परीसर तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
हॉटेल चालक, हातगाड्या धारक व अवैध प्रवासी वाहने यांच्या अतिक्रमणामुळे बसस्थानक दिसेनासे झाले आहे.
नागरीकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अतिक्रमण धारकांच्या मनमानी ला व अरेरावी च्या भाषेला पायबंद बसेल का अन्यथा अतिक्रमण करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आम्हीं नगरपालिकेला कर भरतो म्हणून आमची अतिक्रमणे कोणीही काढू शकत नाही अशी भाषा सदर अतिक्रमणधारक करीत असल्याने बोलले जाते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!