एरंडोलला अखण्ड हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्साहात संपन्न
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील देशमुख मढी येथे अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताह नुकताच उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. यावेळी काल्याच्या कीर्तनात हभप विजय भामरे महाराज यांनी पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना हा पारमार्थिक कार्यासाठी पर्वकाळ असून थोडं जरी पुण्य केले तरी डबल फायदा मिळतो असे प्रतिपादन करून भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीला कथन केल्या. गौळणी व अभंग गायनातून सर्वश्रोते मंत्रमुग्ध झाले.
सप्ताहात ह.भ.प. संजय महाराज गुरव (फरकांडे), ह.भ.प.जितेश महाराज (म्हसावद), ह.भ.प. प्रा. सी. एस. पाटिल (धरणगाव), ह.भ.प.चंद्रकांत महाराज (म्हसावद), ह.भ.प. भागवत महाराज शिरसोली, ह.भ.प.निवृती मोरे, (पोलिस ) पाचोरा, ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर, चाळीसगांव यांची कीर्तने झाली तर ह.भ.प. विजय महाराज भामरे ( अध्यक्ष, श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान) यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी गायनाचार्य- ह.भ.प. प्रमोद महाराज, बाम्हने , ह.भ.प.कल्याण महाराज, आडगाव, मृदंगाचार्य – ह.भ.प.अनिल महाराज, बाम्हणे.यांनी साथसंगत केली. येथील उद्योजक संजय काबरे यांनी महाप्रसाद सेवा केली. विनोद देशमुख, सुरेश राजधर देशमुख, गणेश देशमुख, भगवान देशमुख यांचेसह देशमुख मढ़ी पंचमंडळ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात महिला मंडळ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठ सप्ताह समिति तील सुभाष वाणी, नाना देशमुख, किशोर देशमुख, कौतिक पाटील, नाना वायरमन यांनी परिश्रम घेतले. र् तालुका आणि परिसरातील असंख्य भाविकांनी शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेतला.