एरंडोल येथे दिवंगत प्रा.हरी नरके यांना वाहिली श्रद्धांजली.
प्रतिनिधी – एरंडोल येथील दिवंगत प्रा. हरी नरके यांना त्याचे विचारांचे अनुयायी यांनी नुकतीच श्रद्धांजली वाहिली.
एरंडोल येथील महात्मा फुले पुतळा या ठिकाणी. दिवंगत प्रा.हरी नरके यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रा. हरी नरके यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, निवृत्त तहसीलदार अरुण माळी,प्रा. भरत शिरसाठ, काँग्रेस प्रदेश सदस्य विजय महाजन,माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,राकेश पाटील आदींनी प्राध्यापक हरी नरके यांच्या विचारांना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा.हरी नरके यांचे असंख्य अनुयायी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी तर आभार कैलास महाजन यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले युवा क्रांती मंच, सत्यशोधक समाज संघ व समता शिक्षक संघटना यांनी परिश्रम घेतले.