एरंडोलला शेतकरी कामगार युनियनतर्फे मेळावा संपन्न
प्रतिनिधी एरंडोल- येथील सैय्यद वाडा, युनिटी हॉलमध्ये शेतकरी कामगार यूनियन युनियनतर्फे मेळावा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी मुजाहिद सर जळगाव उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चाळीसगावचे गोकुळ पाटील, सिल्लोडचे प्रवक्ता युनुस पठाण उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संघटनेचे ध्येय, धोरणांविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सैय्यद शहबाज यांनी तर अर्शद सर यांनी सुत्रसचालन केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील नागरीक उपस्थित होते.