जळगावच्या सुमीत छाजेर यांनी कासोद्यात ७५ वा स्वातंत्र दिन केला संस्मरणीय
प्रतिनिधी – कासोद्याच्या क.न.मंत्री कन्या विद्यालय व होली इंग्लीश मेडीयम या शाळेत स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला,परंतू यंदाचा हा उपक्रम खुपच खास व संस्मरणीय ठरावा असा होता.
ध्वजारोहण,सत्कार,मनोगत,यशस्वीतांचे कौतूक हे सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर या कार्यक्रमासाठी खास निमंत्रीत जळगावहून आलेले उद्योजक सुमीत छाजेर यांनी उपस्थित श्रोत्यांनी कधी ही न अनुभवलेले जादूचे अनेक प्रयोग सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
पांचशे रुपयांच्या अनेक नोटा एका छोट्या कागदातून बनवणे,पांच रुपयांचे नाणं हवेत तरंगवणे, हात रुमाल कैचीने सर्वासमोर कापणे, पण तो रुमाल सुरक्षीत असणे,साधा कागद एका मोठ्या सशक्त व्यक्तीला पूर्ण ताकद लाऊन देखील न फाडता येणे,पण तोच कागद एक लहान विद्यार्थी सेकंदात फाडतो,असे एक ना अनेक जादूचे भन्नाट प्रयोग करुन दाखवले.
विद्यार्थी व उपस्थित सर्वांना चक्राऊन टाकणारे हे प्रयोग होते.
त्यांच्या या अनोख्या प्रयोगांमुळे यंदाचा हा कार्यक्रम खुपच प्रभावी ठरला आहे,निरज मंत्री यांच्या विनंतीवरुन छाजेर पती-पत्नी दोघेही सकाळीच कासोद्यात दाखल झाले होते.