मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील १८ ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने केली लंपास..!
एरंडोल: येथील विमलबाई लक्ष्मण चौधरी या घराकडून निघून दत्तमंदिराकडे पहाटे फिरण्यास जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १८ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास करून पोबारा केला. हि घटना शासकीय विश्राम गृहासमोर गुरूवारी सकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन संशयीत आरोपी हे दुचाकीने येवून त्यांनी दुचाकी थांबविली व मागे बसलेल्या संशयीत आरोपी दुचाकीवरून उतरून विमलाबाई चौधरी यांना धरणगाव कडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारले त्याबाबत माहिती दिल्यानंतर लघुशंकेला जायचे असल्याने विमलबाई पुढे जाण्यास सांगण्यात आले. त्या पुढे जात असल्याची संधी साधून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढण्याचा प्रयत्न संशयीत आरोपीने केला असता विमलबाई यांनी पोत पकडुन ठेवल्याने पोत अर्ध्यातून तुटली व तुटलेली पोत घेऊन संशयीत अज्ञात चोरट्याने मक्याच्या शेतात पलायन केले.
दरम्यान दुचाकीवरील त्याचे दोन्हीं साथीदार हे पळत असताना पाहून विमलाबाई यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. समोरून येणाऱ्या करण दिलीपसिंग परदेशी याने दोन्हीं साथीदार संशयीत चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाचा मोबाईल खाली पडला माञ या झटापटीत दोन्हीं आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल हे पुढील तपास करीत आहेत.