कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी अनुदानाचा लाभ मिळण्याबाबत निवेदन सादर..!
एरंडोल: येथे विविध कार्यकारी सोसायटी लि. एरंडोल यांच्यातर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेच्या सन २०१९ च्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहन पर अनुदान लाभ मिळणेबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना जाहीर केली होती असे म्हटले असून या योजनेत आमच्या संस्थेच्या ८०२ शेतकऱ्यांपैकी ६८९ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून अद्याप पावतो ११३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्या असतांना देखील त्यांना लाभ मिळालेला नाही व जे शेतकरी नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांना शासनाने प्रोत्साहन पर ५० हजार रुपये रक्कम देण्याचे निश्चित केले असताना आमच्या संस्थेचे ४१५ शेतकरी पैकी २२२ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला असून १९४ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी सोसायटी च्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी बोंबाबोब आंदोलन करुन कांद्याच्या भवाबद्दल नाराजी व्यक्त केली व शेवटी आमच्या संस्थेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आमची मागणी आपल्या मार्फत शासनाकडे पाठवावी अशी विनंती करण्यात आली असून सदर प्रत सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील व जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठवण्यात आलेली आहे.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन विजय महाजन, व्हाईस चेअरमन निर्मलाबाई महाजन, संचालक दुर्गादास महाजन, रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी, नितीन महाजन, ईश्वर पाटील, योगराज महाजन, राजधर महाजन ( आबा ), वामन धनगर, रघुनाथ ठाकूर, पंडित पाटील, सुमनबाई माळी सचिव बापू पाटील, निमंत्रित संचालक रमेश महाजन, शांताराम महाजन, इच्छाराम महाजन, सुरेश देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, एजाज अहमद, जावेद मुजावर , कर्मचारी मन्साराम महाजन, युवराज महाजन, निंबा माळी, भगवान माळी, अशोक जोशी असे एकूण सुमारे १९४ शेतकरी उपस्थित होते.