चैन चोरट्यांना एरंडोल पोलिसांनी पाचव्या दिवशी केली अटक..
एरंडोल पोलिसांची होत आहे सर्व स्तरातून कौतुक
प्रतिनिधी एरंडोल – येथील विमलाबाई लक्ष्मण चौधरी ह्या दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे मॉर्निंग वॉकला जात असताना तीन अज्ञात चोराने त्यांच्या गळ्यातील १८ ग्राम वजनाची सोन्याची अर्धी पोत चोरून नेली होती त्या अनुषंगाने आज दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडण्यात एरंडोल पोलीस यांना यश आले आहे.
याबाबत एरंडोल पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल येथे विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील १८ ग्राम वजनाची सोन्याची पोत चोरून नेणारे चोरटे हे चाळीसगाव येथील मुसा कादरी बाबा दर्गा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो .नि. गणेश अहिरे पो. उ. नि. शरद बागल, पो. ह. अनिल पाटील पो. ना. मिलिंद कुमावत अकिल मुजावर आदींनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला असता आरोपींना याचा संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात दोघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यात सय्यद तोशिब तय्यब अली (२४ ) रा. पिंप्राळा हुडको जळगाव आकाश राजू खरे (२०) रा. दूध फेडरेशन जळगाव यांना अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून १८ ग्राम वजनाची सोन्याची तुटलेली जगात करण्यात आली.
पुढील तपास आहे स. पो. नि. गणेश अहिरे करीत आहेत.