आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र केवलसिंग पाटील यांना “ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्का र” जाहीर…..
प्रतिनिधी – समाजात वंचित आणि गरजु अशा लोकांना योग्य माहिती नसल्याने तसेच हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च परवडत नसल्याने आजारपणातच दुःखी जिवन कंठावे लागते अशा लोकांच्या अंधकारमय जीवनात एक आशेचा प्रकाश आणून त्यांचे जीवन दुःखमुक्त व निरामय करण्याचे कार्य आरोग्यंम धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अविरतपणे करत आहेत
त्यांच्या या कार्याची दखल दैनिक झुंजार केसरी मुख्य संपादक मुनीर वजीर खान यांच्या माध्यमातून पुणे मध्ये ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही, अशा अनाथ व गरजु मुलांना वेळोवेळी जेवण, कपडे शैक्षणिक साहित्य वाटप करणे.तसेच विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केले
यासारखी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्याने आणि संस्थेचे हे कार्य निरंतर असेच सुरू राहावे यासाठी देखिल संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.