कोणतीही अपेक्षा न बाळगता जनजागृती करणारे कासोद्याचे मधुकर ठाकूर
प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील कासोदा येथील मधुकर जुलाल ठाकूर हे नेहमी आपल्या स्वखर्चाने सायकल वर फलक लावून व माईकवर संभाषण करून ग्रामस्थांना दर वेळेस जसे कोरोना असो, गुरांचा लंपी आजार असो लहान मुलांचे पोलिओ डोस विषयी , पिक विमा योजना , मतदान कार्ड , जल ही जीवन है , पाणी अडवा पाणी जिरवा , झाडे लावा झाडे जगवा , शासनाच्या विविध योजना विषयी अशा जीवनातील अनेक जीवनावश्यक विषयांवरती ते पूर्ण गावात सायकलवर फिरून नेहमी जनजागृती करत असतात. अशीच गुरांच्या लंपी आजाराविषयी जनजागृती करताना आपण समाजाचे काही देणे लागतो व ते हे कार्य करून समाजाचा देणं फेडत आहेत.
गुरांवर लम्पि आजार येण्याची शक्यता आहे पशुपालकांनी घाबरू नये गुरांची काळजी घ्यावी गुरांचे सुरक्षित अंतर ठेवा गुराना वेगवेगळा चारा टाका नियम पाळा पशुधनाचे नुकसान टाळा पुढील आदेश येईपर्यंत गुरांचे बाजार बंद राहतील तरी पशुपालकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे अशी आर्त हाक मुक्या जनावरांच्या प्रेमापोटी ते देत आहेत.
मधुकर ठाकूर यांच्या या कार्याला कासोद्याच्या नागरिकांनी भरभरून प्रेम दिले.