एरंडोलला रा. ति. काबरे विद्यालयात तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील रा. ति. काबरे विद्यालयात तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन एरंडोल तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित सचिव श्रीकांत घनश्याम काबरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन राजीव मणियार, सहसचिव सागर मानुधने, मुख्याध्यापिका मानुधने मॅडम, पर्यवेक्षक मालू सर, कलंत्री सर यांचेसह तालूक्यातील विविध क्षेत्रातील क्रिडाशिक्षक, क्रिडा स्पर्धेत भाग घेतलेले संघ तसेच क्रिडाप्रेमी उपस्थित होते.
दि. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन ए.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे यांचे हस्ते करण्यात आले. यात 17 वर्ष आतील मुलांच्या गटात रा. ति. काबरे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा संघ विजयी झाला. विजयी संघाचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या क्रिडा शिक्षकांचे कौतूक होत आहे.