येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे आदेशास आस्थापना प्रमुख पारधी यांनी दाखवली केराची टोपली…
विशेष प्रतिनिधी येवला नगरपरिषद येथे दि.५/६/२०२३ रोजी सागर साळी यांनी जनमाहिती अधिकारी तथा आस्थापना प्रमुख पारधी यांचेकडे माहिती अधिकार अर्ज करून माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४(१)(ख) नुसार १७ बाबींची माहिती हि माहिती अधिकार लोगोसह साक्षांकित करून मागितली होती.त्यानंतर मला त्यांनी दि.१०/०७/२०२३ रोजी मी वरीलप्रमाणे मागणी केलेली माहिती मला अस्थांपना विभागाकडून तसेच विद्युत विभागाकडून अपूर्ण पुरविली होती.
तसेच सदर माहिती मला माहिती अधिकार लोगोसह सांक्षाकित करून मिळाली नव्हती म्हणून मी दि.१७/७/२०२३ रोजी प्रथम अपील मा मुख्याधिकारी नगरपरिषद येवला यांचेकडे दाखल केले होते.त्यावर दि ११/८/२०२३ रोजी सुनावणी घेण्यात आली .त्यानुसार येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दि.११/८/२०२३ रोजी लेखी आदेश पारित केले सदर आदेशात अर्जदार यांचे अपील मान्य करून विद्यमान जनमाहिती अधिकारी आस्थापना प्रमुख पारधी व विद्युत विभागाचे कटारे यांना आदेश केले होते की सदर आदेश प्राप्त झाल्यापासून ७ दिवसात अपूर्ण असलेली माहीती अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच सदर माहिती विहित मुदतीत देण्याची दक्षता घ्यावी… सदर आदेश अर्जदार यांना दि.२१/८/२०२३ रोजी प्राप्त झाला जनमाहिती अधिकारी पारधी यांनी १७ दिवस विलंबाने मला दि.७/९/२०२३ रोजी पत्रव्यवहार करून अपूर्ण असलेली माहिती मला पूर्ण करून दिली असे भासविले…परंतु त्यांनी मला प्रत्यक्षात अपूर्ण माहिती दिलेली असून येवला नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पागराबाबताची माहिती जाणून बुजून दडपवून ठेवली. तसेच जी काही उर्वरित माहिती दिली आहे ती देखील माहिती, मला अपूर्ण देऊन दुसऱ्यांदा माहिती अधिकार लोगोसह साक्षांकित करून दिली नाही…म्हणून जनमाहिती अधिकार पारधी येवला नगर परिषद यांनी मुख्याधिकारी येवला यांचे आदेशास केराची टोपली दाखवली असून माहिती अधिकाराची खिल्ली उडवली.तसेच कर्तव्यात कसूर केली आहे.म्हणून मा.मुख्याधिकारी नगर परिषद येवला यांनी पारधी यांचेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे