माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे दिले निवेदन…

IMG-20230912-WA0158.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे आज दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी विविध शासकीय कार्यालयातील प्रमुखांना २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासनाची जबाबदारी असून या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी असल्याचे म्हटले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो हे लक्षात घेऊन शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्थ प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा निर्णय २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला असल्याचे म्हटले आहे. सदर निर्णयानुसार दरवर्षी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहेत व या निर्णयानुसार माहिती अधिकारी या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे मदत घ्यावी असे शासनाने सुचवले असल्याचे म्हटले आहे. शेवटी यावर्षी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद सणांची सुट्टी असण्याची शक्यता असल्याने सदर माहिती अधिकार दिन २७ , २९ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा असे म्हटले आहे.
याप्रसंगी महासंघाचे तालुका अध्यक्ष बबन पाटील , मुख्य संघटक सिताराम मराठे प्रचार संघटक तुषार शिंपी , तालुका समन्वयक नितीन ठक्कर , सक्रिय सभासद विज्ञान पाटील , राजधर महाजन , उमेश महाजन हे उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!