शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या ९ विदयार्थ्यांची प्लेसमेंट
प्रतिनिधी – येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह च्या माध्यमातून भारतातील नावाजलेली आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी क्रेमेडाइन हेल्थ प्रायवेट लिमिटेड यांच्या सोबत शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी यांनी मिळून नुकतेच बी. फार्मसी पूर्ण केलेल्या ११ फार्मासिस्ट ना ही संधी दिली, त्यापैकी ०९ विदयार्थ्यांची निवड झाल्याचे कंपनीच्या मानव संसाधन अधिकारी राव मॅडम यांनी महाविद्यालय प्रशासनास कळविले आहे. शास्त्री फौंडेशन चे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी अरविंद राठोड, भानुदास केसेकर, गिरीश पाटील, पुष्कर महाजन, अंकित मरोडे, रामकृष्ण भदाणे, विशाल पाटील, विशाल नवले व राहुल पाटील या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्रा. सुमेश पाटील , शेखर बुंदेले यांनी विशेष परिश्रम घेतले