एरंडोल न्यायालयातर्फे कायदेविषयक शिबीर व राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
प्रतिनिधी – येथील तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय, एरंडोल येथे "NALSA Scheme for legal services to disaster victims" आणि "Public utility services & Central/ State government schemes" या विषयांवर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या अनुषंगाने दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ दिवाणी व फौजदारी न्यायालय एरंडोल येथे
ॲड. ज्ञानेश्वर बी. महाजन
,
बी. एस. मोरे कृषी अधिकारी
, आर. डी.महाजन
, गटशिक्षण अधिकारी यांनी उपरोक्त विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बी. ए. तळेकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, एरंडोल यांनी देखील उपस्थितांना सदर विषयांवर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन बेडिस्कर यांनी केले. त्यानंतर एरंडोल तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ५४ दाखलपुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.१७,६४,३०९/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण २६ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.२०,८८,५२०/- ची तडजोड झाली. एकंदरीत एकुण ८० प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम ३८,५२,८२९/- रु.ची तडजोड झाली. सदर लोकअदालतीस एरंडोल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.ए. तळेकर मॅडम हे पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ
रमेश एम. दाभाडे उपस्थित होते. तसेच सहा. सरकारी अभियोक्ता
डी.बी.वळवी
,
ॲड.
डी.बी.महाजन सचिव तालुका वकील संघ एरंडोल,
ॲड.एम.एम.महाजन
,
ॲड.
एच.बी.पाटील,
ॲड.
ए.एम.काळे,
ॲड.अजिंक्य काळे,
ॲड.डी.डी.पाटील, विधीज्ञ
पी.बी
.पाटील, विधीज्ञ
व्ही.एन.पाटील, श्रीमती प्रतिभा पाटील व इतर विधीज्ञ तसेच चेतन शिरसाठ, नितीन बेडिस्कर,चेतन चव्हाण
, योगेश अत्तरदे,अंकित पुराणिक,
सागर साळवे, श्रीमती एस. ए. देसले, संदीप हरणे व न्यायालयीन कर्मचारी, पो.काॅ. अनंत पाटील
, पो.कॉ. कैलास हडप. इ. उपस्थित होते.