एरंडोलला गौरी-गणपतीची उत्साहात स्थापना-आज विसर्जन
कुळकर्णी परिवारातील वैष्णवी कुळकर्णी हिने सादर केला चांद्रयानचा देखावा
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील रा. हि. जाजू प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री कुळकर्णी आणि रा. ति. काबरे विद्यालयाचे उपशिक्षक आर. एम. कुळकर्णी यांनी आदर्श नगर येथील आपल्या राहत्या घरी गौरी गणपतीची विधीवत उत्साहात स्थापना केली. यावेळी त्यांची कन्या वैष्णवी कुळकर्णी हिने चांद्रयानचा देखावा तयार केला होता.
कुळकर्णी कुटूंबाकडेे ’गौरी गणपती’चा उत्सव दरवर्षी सर्व भाऊबंद एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील 21 तारखेला स्थापना, 22 तारखेला महापूजा आयोजित करण्यात आली होती. तर आज (दि. 23) निरोप (विसर्जन ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी तीर्थप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी नातेवाईकांसह आजुबाजूच्या कॉलनी परिसरातील रहिवाासी, नागरीकांनी प्रसादाचा लाभ घेतला.