सायकलीवर जनजागृतीचा प्रचार करणाऱ्या समाजसेवक यांची जेष्ठ विधितज्ञ यांनी घेतली भेट.
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील एका ध्येय वेड्या समाजसेवकाला जेष्ठ कायदे तज्ञ ॲड.उज्वल निकम यांनी स्वतः भेट घेतली त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कासोडा येथील ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचारी मधुकर ठाकूर हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून स्वखर्चाने सायकलीवर फिरुन जनजागृतीचे काम करतात.नुकताच कासोदा येथील एका कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ विधितज्ञ ॲड.उज्वल निकम हे आले असता त्यांनी मधुकर ठाकुर यांची भेट घेतली व त्यांच्या कार्याची माहिती घेत त्यांचे कौतुक केले.