मुद्रांक विक्रेता विक्रेता संघटनेचे आमदारांना निवेदन
प्रतिनिधी – एरंडोल तहसीलदार कार्यालयाचे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून नवीन इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालय आवारातील मुद्रांक विक्रेता यांना बसण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण उपस्थित होत्या.
यावेळी मुद्रांक विक्रेते योगेश पाटील ,किशोर चौधरी , पांडुरंग मोरे , शालिग्राम पवार योगराज ठाकूर , साहेबराव पानपाटील , अशोक ब्रम्हे , हिरामण चव्हाण राजेंद्र गोसावी आदी बँक विक्रेते उपस्थित होते.