ग्रामपंचायत निवडुकीचा फॉर्म भरून गावाकडे परतणाऱ्या इसमाचा अपघातात मृत्यू..!
एरंडोल: ग्रामपंचायत निवडुकीचा उमेदवारी अर्ज भरून गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या संतोष मराठे यांचा अज्ञात दुचाकी च्या धडकेत मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी २०ऑक्टोबर रोजी एरंडोल – म्हसावद रस्त्यावरील जय भद्रा पेट्रोल पंपासमोर घडली.
वरखेडी येथील रहिवासी संतोष दगडू मराठे हे वरखेडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी एरंडोल तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज भरायला गेले त्यानंतर ते आपल्या एम.एच.१९ बी.आर.३१०६ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे परतत असताना समोरून येणाऱ्या एम.एच.१९ के.जी.५११६ क्रमांकाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मराठे हे जागीच गतप्राण झाले.
पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी हे करीत आहेत.