कु.रोहिणी ने सलग दहा तासाच्या अथक प्रयत्नांनी रांगोळीतून साकारले श्री महालक्ष्मीची सुंदर चित्रकृती
एरंडोल..येथील माळी वाड्यातील रहिवासी कु. रोहिणी सुनील पाटील या सावित्रीच्या लेकीने नवरात्र उत्सव निमित्त सलग दहा तासाच्या अथक प्रयत्नांनी रांगोळीतून श्री महालक्ष्मीची सुंदर कलाकृती निर्माण केली असून तिच्या या अद्भूत कलेचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १० वाजेपासून ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पहाटे ७ वाजे पर्यंत या दरम्यान रोहिणी ने कुठलीही विश्रांती न घेता वा कुठलाही खंड न पडू देता ही सुंदर कलाकृती सिद्ध केली आहे.यापूर्वीही तिने श्री महादेवासह अन्य कलाकृतीसाठी विशेष मेहनत घेतली असून यासाठी तिने युटूब ची मदत घेतली आहे.
ती येथील सूर्योदय जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे संचालक गणेश नामदेव पाटील यांची नात तर महाबिजचे सुनिल पाटील यांची मुलगी तर पी आर.हायस्कूल धरणगाव चे प्राथमिक शिक्षक एन जी पाटील यांची ती पुतणी होय. श्री महालक्ष्मीची हुबेहूब व बोलकी कलाकृती चे राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक प्रवीण आधार आहे यांनी कौतुक केले आहे.