कंत्राटीकरण व दत्तक शाळा योजना संबंधी राज्यशासनाने जाहीर केलेले निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसील कचेरी समोर शिक्षकांचे आंदोलन..!
एरंडोल: तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ,तालुका माध्यमिक शिक्षक संघ,भारती प्राथमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना,शिक्षकेतर संघटना या शिक्षक संघटनांतर्फे कंत्राटीकरण व दत्तक शाळा योजनेच्या विरोधात सोमवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष रवी चौधरी, जि.प.माजी सदस्य नानाभाऊ महाजन, जि.प.माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्र्वर आमले, माजी नगरसेवक कुणाल महाजन, जळू चे सरपंच गुलाब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.
प्रमोद चिलाणेकर,आर.टी.पाटील,राजेंद्र शिंदे,शेखर पाटील, राजेंद्र ठाकरे, शेख सलीम, अहिरे यांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले.
मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष आर.टी.पाटील, माध्यमिक शिक्षक संघटने चे तालुकाध्यक्ष आर.ए.शिंदे, प्रमोद चिलाणेकर, शेख सलीम,राजेंद्र ठाकरे, शेखर पाटील, बी.के.धूत,अनुष्का विसपुते, दिपक पाटील, शारदा पाटील, श्रीकांत बिर्ला, दिनेश चव्हाण, भगतसिंग पाटील, फारूख सर आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदे भरण्यासंबंधी चे आदेश रद्द करावेत, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत या मागण्यांसह एकूण ६ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.