एरंडोल येथे २६ ऑक्टोंबर रोजी बेरोजगार युवक व युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन..!
प्रतिनिधी एरंडोल – वाढत्या बेरोजगारी ची समस्या विचारात घेऊन सदर समस्या सोडविण्याकामी खारीचा वाटा उचलावा या उद्देशाने उ.बा.ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने व लक्ष्य फाऊंडेशन चे अध्यक्ष रोशन मराठे यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी येथील कमल लॉन्स वर मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५० ते ६० नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये ५ हजार युवक- युवतींना रोजगार देण्यात येईल अशी ग्वाही २४ ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी येथील शासकीय विश्रामगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस शिवसेना उ.बा.ठा गटाचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, लक्ष्य फाऊंडेशन चे अध्यक्ष रोशन मराठे,अरुण महाजन आदी उपस्थित होते.
मोफत रोजगार मेळाव्यात सकाळी दहा वाजेपासून प्रथमच २०० मुला-मुलींना जळगाव, मुंबई , पुणे, नाशिक व संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत नोकरीची संधी देण्यात येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग,फायनान्स, रिटेल, सेल्स, मार्केटिंग, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, टेलिकॉम व इतर.
आय.टी,बी.पीओ,के.पी.ओ,फार्मा आदी क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकते.
८वी ते सर्व पदवीधर व पदव्युत्तर आदी शैक्षणिक पात्रताधारक युवक- युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.