आदर्श नगर येथील नारी शक्तीने केली आदर्श कामगिरी…..
एरंडोल – येथील आदर्श नगर कॉलनी मधील रहिवासी यांनी प्रथमच गणपती मंडळ स्थापन केले. त्यामुळे कॉलनी मधील रहिवाश्यांच्या उत्साहात भर पडली व त्या उत्साहात कॉलनीतील महिलां मधील दुर्गा जागी होऊन त्यांनी पदर खोचून ओपन स्पेस मधील झाडेझुडपे, गवत व घाण स्वच्छ करून त्यात कोणी हे पाहिले नाही की मी इंजिनिअर ची पत्नी, सरांची पत्नी, अधिकार्यांची पत्नी की शेतकऱ्यांची पत्नी सर्व नारी शक्ती मिळून नारी शक्ती दुर्गादेवी महिला मंडळ स्थापन केले. दुर्गादेवी ची प्रथमच स्थापना करुन मुलांना अभ्यासक्रमात अडचण येणार नाही अश्या प्रकारे नियोजन करुन सर्वांनी नऊ दिवस दांडिया खेळत देवीची उपासना केली.
अश्या प्रकारे आदर्श नगरातील महिलांनी ” नारी तु नारायणी ” हे सिध्द केले. या सर्व नारी शक्ती वंदनीय आहेत.
कॉलनीतील सर्व समाजाच्या महिला व पुरुष एकाच कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावून सर्वांना मार्गदर्शन केले. नवरात्रोत्सवा निमित दहा दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले. विजयादशमीच्या दिवशी श्रीराम, लक्ष्मण आणि भगवान हनुमान यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले.
या वेळी अनेकांनी टिव्ही सिरीयल तारक मेहता का उलटा चष्मा मधील गोकुलधाम सोसायटी मधील उत्सव साजरा केला जातो त्या प्रमाणे आदर्श नगर कॉलनीत प्रत्यक्ष अनुभवले.
महिलांनी कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वी केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे, संध्या वैसाणे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, शुभांगी पाटील, मेघा पाटील, वैशाली पाटील, दिव्या पाटील, सीमा पाटील, मयुरी बाविस्कर, तनुश्री महाजन, सुनंदा पाटील, मनीषा भालेराव, अर्चना भामरे, वैशाली बेळगे, मंजूषा मुरमुरे, देविका चौधरी, गौरी मानुधने, वंदना पाटील, जयश्री कुलकर्णी, कविता करनकाळ, मनीषा पाटील, भारती सावंत, लीना बोरसे, सुनीता महाजन, सरिता धाडसे, पूनम पाटील, सुरेखा पाटील, मीरा महाजन यांच्यासह कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रम आयोजित करताना पुरुष मंडळी यांनी सुध्दा महिलांच्या या कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
एरंडोल येथील लक्ष्मी नगर व ओम नगर मध्ये नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा
एरंडोल : नवीन धरणगाव रोड परिसरातील लक्ष्मी नगर मित्र मंडळा तर्फे व ओम नगर दुर्गा उत्सव मंडळ नवरात्री निमित्त महिलां करीता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात प्रामुख्याने बेस्ट दांडिया , गरबा , डान्स,वेशभूषा, लिंबू चमचा या सारखे स्पर्धेत महिलांना पैठणी,प्रेशर कुकर,असे उपयोगी पारितोषिक ठेवण्यात आले होते.यात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.