भूमी अभिलेख कार्यालयात लोकांची कामे न झाल्यास काॅऺग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा…

IMG_20231031_080535.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून तालुक्यातील व शहरातील लोकांची कामे वर्षानुवर्षे होत नसून या निमित्ताने महाराष्ट्र काँग्रेस प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन, सुनील गोविंदा पाटील एरंडोल तालुकाध्यक्ष, शेख कलीम हुसेन अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, सागर पाटील , डॉ. प्रशांत पाटील उपजिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यांनी एरंडोल तालुका भूमि अभिलेख या कार्यालयात भेट दिली असता भूमि अभिलेखचे तालुका उप अधिक्षक यांच्यासमोर संताप व्यक्त केला व एरंडोल तालुक्यातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल व वर्षांनुवर्षे होऊन ही न होणाऱ्या कामाबद्दल संताप व्यक्त केला सतत खेड्यापाड्यातली व शहरातली लोकं वर्षांनुवर्षे या कार्यालयात चक्कर मारतात कधी कर्मचारी हजर नसतात,तर काही कर्मचारी काम करण्यास नकार देतात , शुल्लक कारणे दाखवून गावातील नागरिकांची गैरसोय होते.जर अशी परिस्थिती सुधारली नाही तर दिवाळीच्या आत लोकांची कामे झाली नाहीत तर तोंडाला काळे फासण्यात येईल किंवा कार्यालयाला कुलूप लावण्यात येईल. जर सतत असे राहिल्यास एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या मोठे आंदोलन करण्यात येईल याची एरंडोल तालुका भूमि अभिलेख यांनी दखल घ्यावी.

About Author

You may have missed

error: Content is protected !!