एरंडोल नगरपालिका तर्फे उभारला पुस्तकांचा बगिचा

GridArt_20231101_114937625.jpg

एरंडोल : आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहीला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल 33 गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा नव्हे तर गावच साकारले आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष!

आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

33 गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा

शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलध्द असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत. पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. बगीच्यात पुर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डन मधे प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचा बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून पुस्तक वाचता येणार आहे.

बगीच्यात सर्वकाही….

या पुस्तकांच्या बगीच्यात ग्रीन लाॅन व विविध सुगंधीत फुलझाड आहेत. त्यातुन वातावरण सुगंधीमय होणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी कवितांचे पोर्ट्रेट करण्यात आले आहे. ग्रीन जीमची ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक व वृक्ष यावर आधारीत भितीचित्र रंगविण्यात आले आहे. कवयित्री बहीणाबाईच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. याबरोबरच पुस्तक प्रेमी वाचक प्रतीत करणारे पुतळे करण्यात आले आहे.

जेष्ठासाठी विषेश सोयी

म्हातारपणात माणस ही बगीच्यातच अधिक रमतात. त्यादृष्टीने पालिकेने नाना-नानी पार्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. या गार्डन मधे लहानपासुन वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या गरजा लक्षात घेण्यात आले आहे हे विशेष. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तक येथे उपलध्द असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंट ही तयार करण्यात आला आहे.

चौकट
राज्यातला पहीलाच प्रयोग

एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहीलाच प्रयोग आहे. हा नाविन्यपूर्ण बगीचा निश्चितच वाचन संस्कृती व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या बागेची रचना ही सगळ्याच घटकांचा विचार करून करण्यात आली आहे. हा बगीचा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे हे निश्चित! एरंडोल वासीयांसाठी हे गार्डन पर्वणीच ठरणार आहे. या बगीच्याचीच सर्वत्र चर्चा सध्या कानी पडत आहे.

प्रतिक्रीया
शहरातील नागरीकांमधे वाचन संस्कृती वृध्दिगंत व्हावी या उद्देशाने या पुस्तक बागेची निर्मिती करण्यात येत आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्व जण पुस्तक वाचन करू शकतील अशी पुस्तक व व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच हा बगीचा नागरिकांसाठी हे गार्डन खुले होणार आहे..
-विकास नवाळे
मुख्याधिकारी-एरंडोल नगरपरीषद

About Author

You may have missed

error: Content is protected !!