अज्ञात चोरांनी पळविली रिक्षा.
एरंडोल – प्रतिनिधी येथील देशपांडे गल्लीत राहणारे सचिन यशवंत सोनार यांच्या मालकीची घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात चोरांनी पळविली असल्याची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सचिन सोनार यांनी दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९.३० वा. व्यवसाय आटोपून घरी रिक्षा लावून झोपले व दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास उठून अंगणात पाहिले असता त्यांची बजाज ऑटो कंपनीची रिक्षा क्रं. एम एच ४८ एक एक्स ५८५७ दिसून आली नाही.
या प्रकरणी एरंडोल पो. स्टे. ला अज्ञात चोरट्यां विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूढील तपास पो. निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काॅ. अनिल पाटील हे करीत आहेत.