एरंडोल येथे मोफत रोजगार मेळाव्यात २५० युवक युवतींना मिळाले रोजगार नियुक्तीचे पत्र
प्रतिनिधी एरंडोल ;- येथे युवा शक्ती फाउंडेशन नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने व मित्रपरिवार लक्ष फौंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने कमल लॉन्स वर मोफत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन हे होते या प्रसंगी बेरोजगार युवक युवतींना जागेवर नियुक्तीपत्रे देण्यात आली रोजगारासाठी काही युतींनी गुजरातला जाण्याची तयारी दर्शवली त्यांच्या पसंतीनुसार त्यांना गुजरात येथे नियुक्तीपत्र देण्यात आले नियुक्तीपत्र मिळाल्यावर सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
व्यासपीठावर उद्योजक समाधान पाटील अरुण माळी शालिग्राम गायकवाड रुपेश माळी किशोर निंबाळकर अनिल महाजन विजय पाटील प्रसाद दंडवते सुनील मराठे अशोक मराठे आर बी पाटील सलीम शेख दशरथ महाजन महानंदाताई पाटील जगदीश पाटील कुणाल महाजन अतुल महाजन रवींद्र चौधरी गुलाब राजपूत प्रमोद महाजन
आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक रोशन मराठे यांनी केले सूत्रसंचालन संदीप महाजन यांनी केले आभार प्रदर्शन दशरथ महाजन यांनी केले