पद्मालय शिवारात आढळून आले अनोळखी इसमाचे प्रेत
एरंडोल:-येथे गालापूर रस्त्यालगत रईस खान दाऊद खान यांच्या शेतात एका अदमासे ६५ वर्ष वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मिळून आला. याबाबत पुण्या दिलदार बारेला या पद्मालय फाट्या नजीक शेतात राहणाऱ्या इसमाने एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी, राजेश पाटील, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहेत