मराठा समाजाच्या आरक्षण समर्थनासाठी एरंडोल येथे लाक्षणिक उपोषण…
एरंडोल:-मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी येथे तालुका सकल मराठा समाजातर्फे तहसील कचेरी समोर गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी उबाठा शिवसेना गटाचे हर्षल माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अमित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, नगराध्यक्ष देविदास महाजन माजी उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील, प्रा. मनोज पाटील जगदीश पाटील, एस आर पाटील , रवींद्र पाटील, प्रा. आर एस पाटील ,डी एस पाटील गजानन पाटील, ॲड. अरुण देशमुख, एस ए इंगळे , प्रा. अहिरराव , पंकज पाटील , स्वप्निल सावंत, राकेश पाटील. प्रशांत पाटील, आर ए शिंदे, सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन जगदीश पाटील , शेखर पाटील, विकास पाटील, बाळासाहेब पाटील , हिम्मतराव पाटील , मनोज मराठे आदी मान्यवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर मंडप टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा उबाठा गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर हर्षल माने यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलन करताना पुढे बोलताना इशारा दिला.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. पण यावेळी आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विलंब होत असल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून समाज अधिक आक्रमक होत असल्याच्या भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केल्या.