एरंडोल वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड.
एरंडोल – येथील वकिल संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.०१/११/२०२३ रोजी वकील संघाचे कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात मान्यवर सभासदांचे हजेरीत झाली. सदरच्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट ए. पी. देशमुख यांची सर्वानुमते निवड करणेत आली. सचिव म्हणून ॲड. डि. एस. पाटील यांची तसेच सहसचिव म्हणून ॲड. प्रेमराज बी. पाटील यांची निवड सर्वानुमते करणेत आली. तसेच संघाचे ऑडीटर म्हणून जेष्ठ ॲड. ओ.पी. जोशी यांची देखील निवड सर्वानुमते करणेत आली.
सदरच्या सभेत जेष्ठ विधीतज्ञ ॲड. सी. आर. बिर्ला, ॲड. ए. एम. काळे, ॲड. ए. पी. देशमुख, ॲड. जगन्नाथ.जी. पाटील, ॲड. प्रकाश बिर्ला, ॲड. भूषण सी. मालते, ॲड. ओ. पी. जोशी, ॲड. ओ.टी. पाटील, ॲड. आर. एम. दाभाडे, ॲड. एस. जे. काळे, ॲड. एम. ओ. काबरे, ॲड. एच. एम. चौधरी, ॲड. एम. एम. महाजन, ॲड. एच. बी. पाटील, ॲड. एस. आर. खैरनार, ॲड. ओ.ओ.पाटील, ॲड. डी. बी. महाजन, ॲड. के. जी. भाटीया, ॲड. ए. जे. सैय्यद, ॲड. व्ही. एन. पाटील, ॲड. एम. एम. पठाण, ॲड. प्रतिभा एस. पाटील, ॲड . आकाश. एन. महाजन, ॲड. एस. यु. पाठक, ॲड. प्रेमराज बी. पाटील, ॲड. मधुकर भिमराव देशमुख, ॲड. अजिंक्य आल्हाद काळे, ॲड. दिपमाला ए. सोनवणे, ॲड. निरज ए. जगताप, ॲड. सी. एस. पारखे, ॲड. जयेश ए. पिलोरे आणि अन्य सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. सदरच्या वकील संघाचे वार्षिक सभेत सन २०२३-२४ साठी कार्यकारिणीची निवड करणेत आली.
सदरच्या सभेनंतर सभासदांनी माजी कार्यकारिणीचे आभार मानून नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना सन २०२३-२४ साठी शुभेच्छा दिल्या.