टेनिस क्लब परिसर बनला दारूचा अड्डा.

IMG-20231102-WA0228.jpg

प्रतिनिधी – एरंडोल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टेनिस क्लबच्या आवारात दररोज दारू पिणारे टवाळखोर रात्रीच्या सुमारास दारू पितात व त्या ठिकाणी गोंधळ घालतात तरीही त्यांच्यावर कोणीही कार्यवाही करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एरंडोल शहरात अनेक वर्षापासून शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा क्लब असून त्यास टेनिस क्लब नावाने ओळखले जाते.सदर क्लब न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागून आहे.सदर क्लब समोर शहरातील मोठी शाळा असून त्याला लागून पोलीस स्टेशन, शिक्षण विभागाचे कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय, सामाजिक बांधकाम,पंचायत समिती,बाल प्रकल्प विभाग असे अनेक शासकीय – निम शासकीय कार्यालय आहेत. दिवसभर या ठिकाणी वर्दळ असते.संध्याकाळी मात्र शांतता झाल्यावर टवाळखोर या ठिकाणी दारू आणून पीत असतात व गोंधळ घालतात या ठिकाणावरून अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कुटुंब तसेच गावातील महिला ये- जा करतात.सदर प्रकारामुळे त्यांना नेहमी त्रास सहन करावा लागतो.सदर प्रकार लवकरात लवकर थांबावा अशी मागणी जोर धरत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!