Viral Video: प्रेमासाठी कायपण! तरुणीने बॉयफ्रेंडला चक्क कुलरमध्ये लपवलं.
प्रेमासाठी कायपण! म्हणत एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार असणारी अनेक कपल तुम्ही पाहिली असतील. जगाची पर्वा न करता प्रेम करुया खुल्लमखुल्ला म्हणत ही जोडपी एकमेकांना गुपचूप भेटत असतात.घरच्यांचा डोळा चुकवून आपली लवस्टोरी खुलवत असतात. परंतु एकदिवस त्यांच्या या सिक्रेट लवस्टोरीचा भांडाफोड होतोच. सध्या राजस्थानमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
लैला- मजनुचा. घरी कोणी नसल्याचे पाहून गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला बोलावले. मध्यरात्री हा हिरो आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी दाखल झाला. परंतु त्यांच्या या चोरी- चोरी चुपके चुपके ठरलेल्या भेटीचा घरच्यांना सुगावा लागला
https://twitter.com/gharkekalesh/status/1720686118583328805?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1720686118583328805%7Ctwgr%5E7c3db198b1b40b2c13e40421fd16afb4d987a2d4%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
घरच्यांना बॉयफ्रेंड आल्याची माहिती मिळाली हे समजल्यावर तरुणीने त्याला चक्क कुलरमध्ये लपवलं. तरीही घरच्यांनी त्याला शोधून काढले अन् चांगलाच राडा झाला. अगदी चित्रपटात घडावा अशा या स्टोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.