पाच लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

IMG-20231114-WA0045.jpg


प्रतिनिधी एरंडोल – जळगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले विस्तार अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
दिवाळीच्या सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊन पाच लाखांची लाच स्वीकारणार्‍या सहायक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले .लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती.या चौकशीत अनुकुल असा अहवाल देण्याच्या बदल्यात त्याला संबंधीत समितीचे अध्यक्ष व सदस्याने तब्बल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती.तर,संबंधीत व्यक्तीने या संदर्भात जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीनुसार आज पाडव्याची सुटी असतांना देखील सहायक गटविकास अधिकारी रवींद्र शालीग्राम सपकाळे ( वय ५४) आणि विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (वय ५३) या पंचायत समितीतील दोन्ही अधिकार्‍यांनी तक्रारदाराला बोलावले होते.येथे पाच लाखांची लाच स्वीकारत असतांना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. यामुळे सुटीच्या दिवशी लाच घेणे या दोघांना महाग पडल्याचे दिसून आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे,पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव,बाळू मराठे,सुनील वानखेडे,राकेश दुसाने,दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील,रवींद्र घुगे,महिला हवालदार शैला धनगर,किशोर महाजन,प्रदीप पोळ,प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!