बंद घर पाहून चोरट्यांनी साधला डाव….. रोकड व दागिन्यांवर मारला डल्ला…
एरंडोल : येथील कागदीपुरा भागात किराणा व्यावसायीक
खालीक अहमद रफिक अहमद (३९) हे कुटूंबासह वास्तव्याला असून अमरावती येथे लग्न असल्याने कुटूंब लग्नासाठी गावी गेल्याने १५ ते १७ नोव्हेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधत बंद घराच्या मागील दरवाजाला होल करीत कडी उघडून घरात प्रवेश करून दोन लाख ३८ हजार ६४२ रुपये किंमतीचे एकूण ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ,१० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे हार, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्यातील रींगा व अडीच लाखांची रोकड असा एकूण चार लाख ८८ हजार ६४२ रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला.
बंद घर असल्याने चोरटे संधी साधत असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. लग्नानिमित्त कुटूंब बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी संधी साधत पावणे पाच लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना शहरातील कागदीपुऱ्यात घडली. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी भेट देत पाहणी केली.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यां विरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.