नुरुद्दीन मुल्लाजी नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड ने सन्मानित
एरंडोल (प्रतिनिधी) – मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा संघटक त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्रचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांना आधार सोशल फाउंडेशन च्या वतीने पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील सभा गृहात डॉ, सौ सुनीता मोडक अनाथांची नात सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या संस्थापक अध्यक्ष कल्याणी महिला सेवाभावी संस्था नाशिक मा, रवींद्र कुलकर्णी निवृत्ती जिल्हा न्यायाधीश पुणे प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते शिक्षक कोगनोळी कर्नाटक यांच्या उपस्थितीत श्री मुललाजी यांना नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले
हा पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही पावतीच आहे दुखी पीडितांचे दुख दूर करण्यासाठी नेहमी झटत असतात शासन दरबारी त्यांच्या पाठपुरावा करून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास नेहमी अग्रेसर असतात त्यांचे हेच सेवाभावी कार्य अनेक संस्थांना पुरस्कार देण्यासाठी उत्तेजित करतात नेहमी राष्ट्रीय पुरुषांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून हिंदू मुस्लिम एकता घडविण्यास मदत करतात आरोग्य शिबिर ,रमजान ईद, रक्षाबंधन असे अनेक कार्यक्रम हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्रित करून समाज कार्य करीत आहे
त्यांनी पैगंबर जयंती, मौलाना आझाद जयंती ,मोहरम निमित्त सिबिल कार्यक्रम च्या पायंडा कासोदा गावात घातला आहे त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांना हा 84 वा अवार्ड आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे