एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एकाचे सभासदत्व रद्द चार जणांचे सदस्यत्व निलंबन
एरंडोल : एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर ठराव करून संस्थेच्या हिताविरुद्ध कार्य केले म्हणून एका सदस्याचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द तर चार जणांचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे.
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची सभा नुकतीच झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र द्वारकादास काबरे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत कांतीलाल काबरे, सचिव श्रीकांत घनश्याम काबरे व संस्थेचे इतर कार्यकारिणी सदस्य तसेच सभासद उपस्थित होते. त्यात वरील निर्णय घेण्यात आला.
संस्थेच्या हिताविरुद्ध कार्य केले म्हणून मनोज घनश्याम बिर्ला यांचे , सदस्यपद कायमस्वरूपी रद्द करण्यात आले तर गोविंद लढे, सुनील झवर, किरण लढे व राजश्री मनोज बिर्ला यांचे सदस्यपद निलंबित करण्यात आले
संस्थेच्या हिताविरुद्ध कार्य करणाऱ्या सभासदांवर कारवाई करण्याबाबत संस्थेचे सभासद विवेक घनश्याम काबरे, सुरजचंद्र शरदचंद्र काबरे यांनी अर्ज दिले होते. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती त्याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
कोट :-
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाने माझे सदस्य पद कायमस्वरूपी रद्द केल्या बाबतचे पत्र मला आज पर्यंत मिळालेले नाही मंडळाच्या घटनेतील नियमानुसार तसे कोणीही करू शकत नाही तसे करण्यापूर्वी मला नोटीस देखील मिळालेले नाही मंडळाच्या घटना कोणत्याही सभासदांचे सदस्यत्व अशा प्रकारे रद्द करण्याची तरतूद नाही याबाबत मी सक्षम न्यायालयाकडे दाद मागणार आहे
मनोज बिर्ला एरंडोल