एरंडोल येथे माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी – एरंडोल तालुका शहर राष्ट्रीय काँग्रेस आय.ओबीसी सेल कार्यकारी अल्पसंख्या आघाडी यांच्या वतीने तालुक्यात माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.केवडी पुरा येथील विर एकलव्य यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, मुस्लिम समुदाय, आदिवासी बांधव, काँग्रेस प्रेमी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी एरंडोल तालुका कार्यकारी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी, संतोष भाऊ मोरे एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष,जिल्हा उपप्रमुख ओबीसी सेल डॉ. प्रशांत पाटील,दीपक पाटील, जिल्हा उपप्रमुख ओबीसी सेल शेख सांडू ,बबन वंजारी, अल्पसंख्याक युवा शहराध्यक्ष मंटू शेख सत्तार, मुस्लिम समाज पंचमंडळ शेरू शहा नसीर शहा,इरफान शहा सुलतान पठाण,आशिन शहा पप्पू पठाण, दिलीप पठाण,कैलास नाईक सर्व एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.