एरंडोल येथे साकारली अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती….
प्रतिनिधी एरंडोल;- येथे पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दीपावलीच्या मुहूर्तावर दीपोत्सव व श्री हनुमान महाआरती चा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी पांडव वाडा नजीकच्या हनुमान मंदिर परिसरात ५१०० दिवे लावून अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनविण्यात आली डॉक्टर संभाजी राजे पाटील (पारोळा) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दीपोत्सवामुळे पांडव वाडा व हनुमान मंदिर परिसर प्रकाशमान झाला. आणि या तेजोमय वातावरणात भक्ती रसाने भाविक चिंब झाले. यानिमित्त हा परिसर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता तसेच यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणांनी परिसर दणाणला . कार सेवक जगदीश ठाकुर, संजय महाजन व एडवोकेट राहुल पारेख (दोघे धरणगाव) यांची समयोचीत भाषणे झाले हनुमान चालीसा पठण करण्यात आले राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
नथ्थू बापू समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्यासाठी कासोदा दरवाजापासून २ डिसेंबर रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांनी व युवकांनी याप्रसंगी उपस्थिती द्यावी असे आवाहन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुणाल महाजन यांनी यावेळी केले
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी दशरथ महाजन ,राजेंद्र चौधरी ,डॉक्टर संभाजी पाटील, वसंतराव पवार,रमेश महाजन , पांडव वाडा संघर्ष समिती प्रमुख प्रसाद दंडवते, अशोक चौधरी राहुल तिवारी, निलेश परदेशी राजा भिलसेकर नितीन बिर्ला मयूर बिर्ला घनश्याम परदेसी ज्ञानेश्वर वाणी भूषण चौधरी, वीरू महाजन, सुनील चौधरी, राजेंद्र राघो महाजन, रवींद्र दौलत पाटील, भूषण सोनार कुणाल पाटील कल्पेश शिंपी योगेश ठाकूर मयूर महाजन शेखर ठाकूर आदी भाविक उपस्थित होते. सोनपापडी व खडीसाखरचा प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.