डी.डी एस.पी काॅलेज येथे २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रोजगारांच्या मेळाव्यात मिळणार ,आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र….
एरंडोल:- सध्या रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून विशेष करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळत नसल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता डी डी एस पी महाविद्यालयात सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे आयोजन डीडीएसपी महाविद्यालय एरंडोल व अमितदादा फाउंडेश यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे ,नाशिक या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
एरंडोल पारोळा व भडगाव, धरणगाव या तालुक्यांमधील वाणिज्य शाखेचे पदवीधर व पदव्युत्तर यांनी या मेळाव्यात उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अमित दादा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित पाटील, व डी डी एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, डॉ. अरविंद बडगुजर यांनी केले आहे. विशेष हे की इतर ठिकाणी नोकरी करत असलेल्या युवकांना सुद्धा या मेळाव्यात सहभागी होता येईल असे सांगण्यात आले.