कत्तलीच्या उद्देशाने २० गायी-वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले ..!

Screenshot_20230906-102617.jpg

एरंडोल: येथे कत्तलीच्या उद्देशाने आयशर गाडीत २० गायी- वासरांची बेकायदेशीर पणे वाहतूक करतांना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कासोदा नाक्यानजिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली असून आरोपींमध्ये रविंद्र राजेन्द्र माळी,वय ३६, रा.वारे नगर,बिलाडी रोड,देवपूर, धुळे, आबा बजरंग पाटील,वय ४५वर्षे, रा. दुर्गा माता मंदिराजवळ देवपूर, धुळे व इम्रान कंजा कुरैशी वय २२,रा. गोपालपुरा, शमशाबाद, आग्रा (उत्तर प्रदेश).. यांचा समावेश आहे.

एम.एच.१८ बी.जी ७०४० या आयशर वाहनात एकूण ८लाख रुपये किंमतीच्या गायी व वासरांची अवैधपणे वाहतूक केली जात होती असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रसंगी ॲड. अजिंक्य काळे , चंद्रशेखर पारखे व निरज जगताप हे घटनास्थळी उपस्थित होते.


या प्रकरणी पुढील तपास पो.नि.सतीश गोराडे, हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पंकज पाटील हे करित आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!